शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील जि. प. प्राथमिक शाळा नंबर एक मधील विद्यार्थ्यांना आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग क्रांती संघटना तळेगाव ढमढेरे शाखेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र समाजाचा या शाळांना सुविधा पुरवण्याविषयी उदासीन दृष्टिकोन असल्याने शाळांना भौतिक सुविधा मिळत नाहीत. यामध्ये बदल व्हावा व आपण ज्या सरकारी शाळांमध्ये शिकलो त्या शाळांचे आपण देणे लागतो; यातुन अंशतः मुक्त व्हावे या उदात्त भावनेतून शाळेत भूमिगत पाण्याची टाकी बांधून देणारे डॉ.चंद्रकांत केदारी यांनी व ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्यांचे वाटपही याच वेळी करण्यात आले. भविष्यात या शाळेला वेळोवेळी आवश्यकती मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी संबंधितांनी दिले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे, तळेगाव ढमढेरे शाखेचे अध्यक्ष रामभाऊ भुजबळ, पोपट भुजबळ, रोहिदास ढमढेरे, शरद नरके, अरुण गायकवाड, खामु लांडे, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, माऊली आल्हाट, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चैताली भुजबळ, उज्वला दरवडे, शाळेचे मुख्याध्यापक जयवंत भुजबळ तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वाबळे यांनी केले तर माधुरी शेजवळ यांनी आभार मानले.