लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, माननीय . महानवर साहेब. यांचे लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथील सेवेचा कार्यकाळ पूर्ण होऊन दुसऱ्या ठिकाणी शासकीय बदली झाली आहे. त्याजागी अमित गोरे साहेब नियुक्त झाले आहेत.त्यांच्या लोणी काळभोर मधील कार्याची आठवण करत, त्यांच्या असंख्य चहात्या, लोकांनी त्यांचा यथोचित असा सत्कार केला.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पूर्वी पुणे ग्रामीण मध्ये होते, परंतु मध्यंतरी हे पुणे शहर आयुक्तालयास जोडले गेले. लोणी काळभोर पोलीस स्टेशन . पुणे शहर आयुक्तालयास जोडल्यानंतर सगळेच नवीन. या ठिकाणी पाहायला मिळाले. तसं लोणी काळभोर हे ना शहर ना गाव अशी परिस्थिती असताना. देखील त्यांना भक्कमपणे पाठिंबा देणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय महानोर साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचा समन्वय साधण्याचे काम , त्यांच्या सेवेच्या कार्य काळामध्ये केला आहे.
सर्वसामान्य लोकांना एक चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचे काम केले. अगदी साध्यातला साधा माणूस आला तरी अतिशय प्रेमाने आदबीने ते स्वतः त्याचे विचारपूस करत असत. त्यामुळे अल्पावधीत ते या परिसरात सर्वांचे चाहते झाले. आज त्यांचा लोणी काळभोर मधील कार्याचा शेवटचा दिवस त्यांना निरोप देताना खरोखर मन भरून आलं.याप्रमाणे त्यांनी गावांसाठी खूप साऱ्या आठवणी मागे ठेवले आहेत. आज लोणी काळभोर मधील सेवेला पूर्णविराम दिला. त्यांच्या पुढील कार्यास सर्व उपस्थितांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा .उपसरपंच .योगेश प्रल्हाद काळभोर . ग्रामपंचायत लोणी काळभोर सर्व सदस्य, अध्यक्ष. श्री. काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट लोणी काळभोर त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,