लोणीकाळभोर अनिकेत मुळीक
शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर*तब्बल ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षबांधणीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते शिवसेनेच्या शाखा तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना भेट देत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आता संपला आहे. बाकीचे आमदारदेखील बंड करतील, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या याच दाव्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.