अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर --नायजेरियन पती-पत्नी (कपल) यांचेकडुन कोटयावधी रुपयांचे कोकेन,एम.डी.केले जप्त.

Bharari News
0
अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर नायजेरियन पती-पत्नी (कपल) यांचेकडुन कोटयावधी रुपयांचे कोकेन,एम.डी.केले जप्त.

लोणीकाळभोर अनिकेत मुळीक
      आज मंगळवार दि.२६/०७/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक -१ गुन्हे शाखे कडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नालंदा गार्डन रेसीडन्सी,बाणेर पुणे या ठिकाणी एक नायजेरियन कपल पती पत्नी राहत असुन ते रहाते घरातुन कोकेन एम डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करत आहे.   
खबरीचे अनुशंगाने सदरची खबर पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड,सहा.पो.निरीक्षक,लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांना कळविली असता,त्याबाबत मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा कारवाई करुन,नायजेरियन इसम नामे १)उगुचुकु इम्पॅन्युअल (IYI Ugochukwu Emmanuel),वय ४३ वर्षे, रा, नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नंब १३ बाणेर पुणे. मुळ नायजेरीया देश व महिला नामे २)ऐनीबेली ओमामा व्हिवान (Enebeli Omamma Vivian),वय ३० वर्षे,रा.नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नं.१३ बाणेर पुणे. 
 *मुळ नायजेरीया देश हे* बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ६४४ ग्रॅम (एम.डी) मॅफेड्रॉन किरु ९६,६०,०००/- व २०१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन किरु ३०,१६,८००/- व रोख रुपये ०२,१६,०००/- मोबाईल फोन,इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या व डब्या असा ०२,१६,०००/- चा असा एकुण १,३१,०८,८००/- (एक कोटी एकतीस लाख आठ हजार आठशे) चा अंमली पदार्थ व ऐवज ते रहात असलेल्या घरात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आले.
त्यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),२१(क),२२(क),२९ अन्वये म.सहा.पो.निरीक्षक, शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लक्ष्मण ढेंगळे,सहा.पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलिस आयुक्त,पुणे शहर,श्री अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पो आयुक्त,गुन्हे १,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड, सपोनिलक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मारुती पारधी, मनोज सालुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, रेहना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!