सासवड बापू मुळीक
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
स्पर्धेचे हे सलग सातवे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकल स्पर्धा घेण्यात येत आहे.या स्पर्धेतील एमटीबी सायकल स्पर्धा : सासवड ते बारामती ही स्पर्धा सासवड येथून सोडण्यात आली.एमटीबी खुली सायकल स्पर्धा ही पुरूषांसाठी असूनती सासवडला सुरू होउन सासवड - जेजुरी - वाल्हे - निरा डावीकडे वळून सोमेश्वरनगर - वडगाव निंबाळकर - कोऱ्हाळे - पणदरे - बारामती विद्याप्रतिष्ठान येथे समाप्त होईल. सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सासवड येथे माजी जिल्हाधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी माजी आमदार अशोकराव टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम आप्पा इंगळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, रा. कॉ पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, रा. कॉ पार्टीचे विजय कोलते, रा. कॉ पार्टीचे पुरंदर तालुका महिला अध्यक्ष सौ. गौरीताई कुंजीर, रा. कॉ पार्टीचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष बंडूकाका जगताप, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, जि. प. पुणे माजी बांधकाम सभापती दत्तात्रय चव्हाण, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव टकले, निरा मार्केट कमिटी संचालक भानूकाका जगताप, जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, रा. काँ. पुरंदर मा.अध्यक्ष संजय अण्णा जगताप, माजी नगराध्यक्ष दत्तानाना जगताप, जि. प. सदस्य हेमंतकुमार माहूरकर, पुणे जिल्हा मेडिकल असो. राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, राष्ट्रवादी कॉग्रेस सासवड शहराध्यक्ष राहूल गिरमे, पुरंदर रा. काँ. युवक कॉंगेस अध्यक्ष पुष्कराज जाधव, पुरंदर राष्ट्रवादी महिला कॉंगेस सासवड शहर पूजाताई भिंताडे, राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवक्ते नवनाथ बोरावके, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन उत्तम बाप्पू धुमाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष संदेश पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अतुल जगताप, अध्यक्ष, माजी नगराध्यक्षा कलाताई फडतरे, मा. शहराध्यक्ष संतोष जगताप, नगरसेवक दिपकनाना टकले, नगरसेविका मंगलाताई म्हेत्रे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस माजी तालुका अध्यक्ष योगेश फडतरे, वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण इ. मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दु. २:०० वा. बारामती येथील गदिमा सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अमोल मिटकरी यांच्या यांचे शुभहस्ते विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे, बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्राताई पवार, आमदार रोहित पवार जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. अॅड. अशोक प्रभुणे, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, बारामती रा. काँ. पक्षाध्यक्ष संभाजी होळकर, सिने निर्माता व दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री मा. प्राजक्ता गायकवाड उपस्थितीत होणार आहे.दरम्यान सायकल स्पर्धकांचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत त्यांना प्रोत्साहन दिले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सायकलिंग असोसिएशनचे प्रतापराव जाधव, सर्व प्राचार्य, सर्व शाखाप्रमुख, क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा साकार होत आहे.