या पुरस्कारामध्ये ४० लाख रुपये बक्षीस रक्कम आहे..
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
कुठल्याही व्यक्तीला,संस्थेला पुरस्कार मिळत असताना त्यामागे या व्यक्तीच्या संस्थेच्या जडणघडणीमध्ये खूप लोकांचे मोलाचे सहकार्य असते आणि अशा प्रकारचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या व्यक्तींच्या आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
दुष्काळी शिरूर तालुक्यातील एक पुणे नगर रोडवरील लक्षातही न येणाऱ्या छोट्या खेड्यापासून आज स्व.आर आर पाटील सुंदर ग्राम पुरस्कृत प्राप्त कोंढापुरी या गावाच्या जडणघडणीमध्ये १९८५ पासून कोंढापुरीच्या राजकीय,सामाजिक जडणघडणीमध्ये आणि विकासामध्ये कै.अरुण आबा गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे.
शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण आणि त्यांच्यावरील प्रेम ,संघटन कौशल्य व दानशूरपणा या प्रमुख गुणांवर तालुका जिल्हा मधील राजकीय, प्रशासकीय वर्तुळामध्ये आपला दबदबा ठेवत याचा उपयोग कोंढापुरीच्या सर्वांगीण विकासासाठी करताना १९९४ साली गावामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून *स्पेशल इंडस्ट्रियल झोन जाहीर झाला* आणि तिथून पुढे कोंढापुरीच्या विकासाला सुरुवात झाली.सन १९८५ साली सरपंच* झाल्यापासून
आपल्या दूरदृष्टीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असेल,बंदिस्त गटार योजना असेल डांबरी रस्ते असतील, पथदिवे असतील या मूलभूत योजनांपासून, शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करत कोंढापुरी गावच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आबांनी विकास घडवला.
*सत्ताही संपत्तीच्या सौंदर्याने शोभून दिसत नाहि तर तिला सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याची झळाली असली पाहिजे* हे आबांचे राजकीय विचार मनात ठेवत २०१० सर्वात तरुण सरपंच पदाचा मान भूषवत स्वप्नीलभैयांनी हाच वारसा जपत बदलत्या भौगोलिक परिस्थितीनुसार ऊस वाहतुकीसाठी उपयुक्त असलेल्या पानंदरस्त्यांपासून ,राष्ट्रीय पेयजल योजनेतील संपूर्ण कोंढापुरी गावासाठी पाणीपुरवठा योजना, पूर्ण गावासाठी बंदिस्त गटारी योजना,काँक्रीट रस्ते,त्याचप्रमाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातही उल्लेखनीय अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुसज्ज आणि भव्य इमारतीपर्यंत उल्लेखनीय काम केली.
स्वप्निल भैया यांच्या नेतृत्वाखाली आज कोंढापुरी ग्रामपंचायतला हा पुरस्कार मिळाला यामध्ये त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व आजी-माजी ग्रामपंचायत, विविध सहकारी सेवा सोसायटी, सामाजिक संस्था यांची मोलाची साथ आहे.
कोंढापुरी गावच्या ग्राम विकासाच्या जडणघडणीमध्ये आजपर्यंत ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम केले यामध्ये ग्रामविकास अधिकारी श्री.लांडे भाऊसाहेबांपासून, श्री.खैरे भाऊसाहेब, श्री.गंगाधर देशमुख भाऊसाहेब व *विद्यमान तरुण तडफदार ग्रामविकास अधिकारी ज्यांनी हा पुरस्कार मिळावायचाच हे ध्येय उराशी बाळगून खूप कष्ट घेतले असे श्री.रासकर भाऊसाहेब*, सोसायटी सचिव,तलाठी,कृषी अधिकारी,महावितरण अधिकारी,पाटबंधारे खात्यातील अधिकारी,आरोग्य अधिकारी, कोंढापुरी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे पदाधिकारी यांचाही मोलाचा सहभाग आहे.
आजच्या या आपल्या पुरस्काराच्या गुणप्राप्तीमध्ये जे विविध निकष लावले होते यामध्ये *कोंढापुरी ग्राम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून श्री.धनंजय शेठ गायकवाड व उद्योजक विनय शेठ गायकवाड* यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कामाचा मोलाचा सहभाग आहे.
आज रोजी कोंढापुरी ग्रामपंचायतच्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारापासून तर ग्रामविकास रासकर भाऊसाहेबांपर्यंत *विद्यमान सरपंच श्री.संदीप डोमाळे,उपसरपंच सौ सुजाताई गायकवाड* सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी *एका ध्येयाने प्रेरित होऊन काम केले* आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणा दरम्यान *कठोर मेहनत घेऊन सर्व निकष पार करून* हा पुरस्कार प्राप्त केला.
गाव पातळीवर हे सर्व निकष पार करताना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिरूर तालुक्याचे *कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार* यांचे विशेष सहकार्य केले व प्रोत्साहन दिले तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभले.
*स्व.आर आर पाटील (आबा) सुंदर ग्राम जिल्हा स्तरीय जिल्हा स्मार्ट ग्राम (सन २०२१-२२) पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कोंढापुरी गावातील सर्वसामान्य नागरिकांपासून सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचा सहभाग लाभला आहे.*