शिरूर विशेष प्रतिनिधी
कवठे येमाई (ता. शिरुर) येथील भीमाबाई सांडभोर या गावातील कवठे येमाई - मलठण रस्त्यावरील आरोही ढाब्यासमोर उभ्या असताना दोन युवक दुचाकीहून आले त्यांनी भीमाबाई यांना आम्ही पोलीस आहोत, दोन दिवसांपूर्वी एका बाईला चाकू लावून लुटले आहे, तुमचे दागिने काढून कागदावर ठेवून पिशवीत ठेवा
असे सांगत दागिने काढायला लावून कागदात ठेवून पिशवीत ठेवा असे सांगितले, काही वेळात भीमाबाई यांनी पिशवीतील कागद पाहिला असता त्यामध्ये दागिने नव्हते तर दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने लांबवल्याचे लक्षात आले,