सुनील भंडारे पाटील
कोरेगाव
भीमा (ता.शिरूर) येथील पंढरीनाथ नगर मधील उत्तरेकडे वसलेल्या वस्तीच्या
रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.या रस्त्याच्या कामासाठी काही
दिवसांपूर्वी पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता.निधी उपलब्ध
होताच रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली मात्र रस्त्याचे पूर्ण काम न
करता अर्धवट काम करून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
फोटो : पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था
सध्या
पावसाळा सुरू झाला आहे.सदर रस्ता मातीचा असल्याने पावसाच्या पाण्यामुळे
झालेल्या चिखलातून पायी प्रवास करणे ही कठीण झाले आहे.दुचाकी वाहने चखला
मध्ये घसरली जात आहे.येथील ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.या रस्त्याच्या
कामासाठी येथील ग्रामस्थ वारंवार विनंत्या करत असून ग्रामपंचायत याकडे
कानाडोळा करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.