माजी सभापती सुजाता पवार यांनी सणसवाडी कोरेगाव भीमा गटातून निवडणूक लढवावी

Bharari News
0
सणसवाडी सरपंच, उपसरपंच,सदस्य व  कार्यकर्त्यांनी केली मागणी
व्हॉट्स स्टेटस मोठ्या प्रमाणावर ठेवत कार्यकर्त्यांचा अनोखा पाठिंबा

सुनील भंडारे पाटील 
    कोरेगाव भीमा - सणसवाडी ( ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच  सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी  सणसवाडी - कोरेगाव भीमा गटातून जिल्हा परिषद लढवावी अशी विनंती करण्यात आली.  
  सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले असून राजकारणाने जोर धरला आहे. आरक्षण सोडत झाल्याने  इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण पाहायला मिळत आहे.
       नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात सर्वसाधारण महिला असे जिल्हा परिषदेसाठी आरक्षण निघाले असून  जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व माजी सभापती सुजाता पवार यांच्या नावाने जोर धरला असून याबाबत सणसवाडी येथील कार्यकर्त्यांनी सुजाता पवार यांना याबाबत विनंती केली आहे.
         उद्योगनगरी सणसवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांना सणसवाडी व कोरेगाव भिमा या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढन्यासाठी आमदार अशोक पवार यांच्याकडे निवासस्थानी भेट घेऊन मागणी केली तर सुजाता पवार यांना विनंती केली.सणसवाडी व कोरेगाव भिमा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुजाता पवार यांचे व्हॉट्स ॲप स्टेटस ठेवत आपला उत्साह दाखवला आहे.     
 सणसवाडी - कोरेगाव भीमा या गटातील सर्वात मोठे मतदान असणारे ,तालुक्यातील व जिल्ह्यातील मोठी पदे असणारे प्रभावशाली नेत्यांचे गाव आहे. निवडणुकीत हे गाव अत्यंत महत्वाचे मानले जात असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या गावातील कार्यकर्त्यांनी सुजाता पवार यांनी विनंती केली असून याबाबत आमदार अशोक पवार व सुजाता पवार काय भूमिका घेतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.
       उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच संगीता हरगुडे ,उपसरपंच सागर दरेकर ,रांजणगाव देवस्थानचे अध्यक्ष व माजी उपसरपंच विजयराज दरेकर ,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे ,राजेंद्र दरेकर ,अक्षय कानडे ,माजी सरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सुनंदा दरेकर, माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य स्नेहल भुजबळ  ,शशिकला सातपुते रूपाली दरेकर ,सुवर्णा दरेकर ,माजी सरपंच रमेश सातपुते, चेअरमन सुहास दरेकर ,माजी चेअरमन बबुशा दरेकर ,गोरख दरेकर, दगडू दरेकर ,नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, रामदास दरेकर ,राजेश भुजबळ ,प्रशांत दरेकर महेश ढेरंगे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
     माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांचे अनेक कार्यकर्त्यांनी व्हॉट्स ॲपवर स्टेटस ठेवत त्यांना पाठिंबा दर्शवला असून आवाज कोणाचा दाही दिशात घुमला राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याने मात्र व्हॉट्स ॲप गाजवले असल्याचे पाहायला मिळाले. यामधून आमदार दांपत्याने जनसामान्य नागरिकांशी जपलेली आपुलकीची नाळ व विकासाचा अजेंडा यांचा प्रभाव असल्याचे दिसत आहे
            आमदार अशोक पवार म्हणजे विकासाचा दृष्टिकोन ,तळागाळातील घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणारे, नागरिकांच्या आरोग्य सोयीसुविधा ते रेशन वितरण पर्यंत सुधारणा घडवणारे , दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकास यासाठी आमदार अशोक पवार यांच्या विषयी सामान्य जनतेत आदरयुक्त जिव्हाळा आहे.
        सुजाता पवार यांच्या नावाला एक वेगळे वलय असून पूरग्रस्तांना मदत असो की तालुक्यातील कोणतीही समस्या असो यासाठी आमदार दाम्पत्य मोठ्या प्रमाणात काम करत असतात. माजी सभापती सुजाता पवार यांनी कोरोना काळात तालुक्यात कोव्हीड सेंटर उभारून जनतेची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. घाबरलेल्या व हतबल झालेल्या रुग्णांसाठी हे केंद्र संजीवनी केंद्र ठरली होती.येथील भोजन व्यवस्था ते वेळेच्या वेळी गोळ्या व मानसिक आधार देण्याचे महत्वपूर्ण काम सुजाता पवार यांनी केले आहे. त्यातील एक कोव्हीड सेंटर चौफुला येथे उभारण्यात आले होते त्यामुळे वढू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप व आसपासच्या गावातील नागरिकांना सुजाता पवार यांच्या विषयी एक आपुलकीची व भावनिक नाळ जोडलेली आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!