सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (ता शिरूर) येथे सोमवारी रात्री पाट वस्ती रस्त्यावर एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा जनांवर गुन्हे दाखल
करण्यात आले असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पो स्टे गु र
नं -669/2022 भा द वि सं क -302,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे,
याबाबत भूषण उत्तम शेलार रा. चर्मकार गल्ली पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी
फिर्याद दिली आहे,
घटनेच्या वेळी आरोपी विकी खराडे राहणार शिक्रापूर व
त्याचे दोन अनोळखी साथीदार, नाव पत्ता माहिती नाही, तारीख 19/07/2022 रोजी
रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी शिक्रापूर हद्दीतील पाट वस्ती येथे, सिद्धेश
संजय शेलार राहणार शिक्रापूर, तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यावर अज्ञात
कारणावरून धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे,
यासंदर्भात आरोपी विकी खराडे, व त्याचे दोन अज्ञात साथीदार अशा तीन
जणा विरोधी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून,
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलीस फौजदार बनकर करत आहेत,