आंबेगाव प्रमिला टेमगिरे
आज केंद्र सरकारने दिलेल्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत आहे. मानवाबरोबरच इतर प्राणी आणि पर्यावरणाला अतिशय घातक असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ज्यामुळे कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराचे रुग्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सापडत आहे यासाठी मंचर नगरपंचायत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत या संदर्भातील निवेदन भाजपा मंचर महिला शहराध्यक्षा .जागृती ताई. महाजन, शहर उपाध्यक्ष सगुनाताई बाणखेले, सरचिटणीस छायाताई थोरात .यांनी मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज पष्टे यांना दिले.
यावेळी पूर्वी दिलेल्या मंचर शहरातील कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भातील निवेदनांचा पाठपुरावा भाजपा जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग शेठ एरंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे, तालुका संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, यांनी केला.
यावेळी ओबीसी मोर्चा आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश अभंग, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत बाबू थोरात,मंचर शहर अध्यक्ष गणेश बाणखेले, मंचर सरचिटणीस योगेश बोऱ्हाडे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विकास बाणखेले तसेच तुषार बाणखेले आधी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.