लोणी काळभोर अनिकेत मुळीक
तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर येथील डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच वन विभाग लोणी काळभोर यांच्या वतीने १ लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच
पाषाणकर गॅस एजन्सी तर्फे १२ फुटी ३५ वुक्ष या मध्ये करंज , पिंपळ, वड,बुच,स्पोयोडीया,जांभुळ,मोसं बी , झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी श्री.राहुल क्षीरसागर, श्री.अंबादास काळभोर, श्री. धंनजय काळभोर , ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप ,ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय शेंडगे,श्री. विशाल लष्कर मेघराज शेंडगे, उपस्थित होते.
" वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी." संतानी किती आत्मीयतेने निसर्गाबद्दल, वृक्षांबद्दल लिहिले आहे. बहरलेला निसर्ग कोणाला आवडत नाही? पानांची सळसळ, पक्षांचे मधुर गीत, झऱ्यांची खळखळ, धबधब्याचा घन गंभीर नाद, समुद्राच्या लाटांची गाज, निसर्गाचे हे रम्य रूप आपले सगळे दु:ख विसरायला लावते. म्हणूनच आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. नव्हे तर ती जगवली पाहिजेत. सृष्टीच्या या चक्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे अतूट नाते आहे. दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतात तर झाडे कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. अशा तऱ्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व जीव सुखाने राहतात. कारण आता परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीचा समतोल बिघडला आहे. निसर्ग चक्र उलटे फिरू लागले आहे. वातावरणात ऑक्सिजन चे प्रमाण घटून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे साथीचे रोग वाढले आहेत. या साठी सर्वानी येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले. तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भाऊ शेंडगे यांनी पाषाणकर गॅस एजन्सी लोणी काळभोर यांचे आभार मानले.