सासवड बापू मुळीक
ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या तसेच आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या भिवडी( ता. पुरंदर) गावच्या उपसरपंचपदी संजय सोमनाथ दिघे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुष्पा दिलीप वांढेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी ही निवड झाली.
सरपंच श्वेता लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पुष्पा दिलीप वांढेकर, राहुल अंकुश मोकाशी, विजय जगन्नाथ भिंताडे, अश्विनी अमोल चव्हाण, कल्याणी प्रविण पवार, अंजना प्रकाश पवार, सारिका संतोष भिंताडे, ज्योती विजय क्षीरसागर, संदीप उत्तम पवार, ग्रामसेविका उज्वला काळभोर उपस्थित होते.
गावकारभारी माजी सरपंच तात्यासाहेब भिंताडे ,बाळासाहेब भिंताडे, माऊली दिघे, विठ्ठल मोकाशी ,प्रशांत वांढेकर, बापूसाहेब मोकाशी ,आबा मोकाशी, विलास खटाटे, साधू दिघे,सहदेव दिघे आदींसह भिवडीकर ग्रामस्थांनी उपसरपंच संजय दिघे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.
शासनाच्या माध्यमातून विविध विकास योजना राबवून भिवडी गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे उपसरपंच संजय दिघे यांनी सांगितले.