वढू बुद्रुक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लुटला वनभोजन आणि सहलीचा आनंद

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
     आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढु बुद्रुक (ता शिरूर) वतीने एक दिवसीय वन सहल व वनभोजनाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आले होते.  
 रोजच्या जीवनामध्ये व्यायामाला व निसर्गाला अनन्यसाधारण महत्व आहे. सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर या ठिकाणी  सर्व विद्यार्थ्यांना दर्शनासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले. वनराईने नटलेल्या औषधी वनस्पतींची ओळख यानिमित्ताने विद्यार्थ्यांना करण्यात आली.
आज एक ऑगस्ट निमित्त लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मंदिराच्या पायथ्याशी वकृत्व स्पर्धा ही घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद घेता यावा यासाठी वढू बुद्रुक मधील विद्यार्थी प्रेमी पालक किशोर दत्तात्रय भंडारे, भाऊसाहेब शंकर भंडारे,मोरेश्वर शिवाजी शिवले, आणि  रमेश सिताराम भंडारे यांनी विद्यार्थ्यांसाठी फराळ आणि केळी यांची व्यवस्था केली होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे सहलप्रमुख आग्रे सर यांनी केले.या उपक्रमाला  मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण सर, कुरकुटे सर आणि सोमनाथ भंडारे सर, कदम सर, सोनवणे सर ,वनवे सर, काकडे मॅडम ,मोकाशी मॅडम,शिंदे सर, साळुंखे मॅडम ,कंद मॅडम. भामरे सर ,सूर्यवंशी सर, शरद भंडारे सर, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सहलीचा आनंद घेतला, यावेळी निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने निसर्ग व पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!