सतत पडणाऱ्या पावसामुळे केंदूर ठाकरवाडी येथील 45 घरांची दयनीय अवस्था

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
         केंदूर ठाकरवाडी (ता शिरूर) या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन दिवसापूर्वी रामा गावडे यांचे घर कडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती, यामध्ये एक महिला जखमी झाली होती, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेला आहे,  
त्या वस्तीमध्ये एकूण अंदाजे 45
घरे असून त्या सर्वच घरांची परिस्थिती अतिशय बिकट झालेले आहे वस्तीतील सर्व घरांची पाहणी केंदूर गावचे सरपंच अविनाश साकोरे,उपसरपंच योगिता थिटे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती गावडे,सूर्यकांत थिटे, विठ्ठल ताथवडे,युवा नेते गणेश थिटे,गावचे तलाठी  घोडे दादा, यांनी पाहणी करून घोडे यांनी त्या सर्व 45 कुटुंबांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्थलांतर होण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्या शाळेचे काम चालू असल्यामुळे लोकांना त्या लोकांना उद्या शाळेमध्ये व्यवस्था करणार आहे परंतु आजची रात्र त्यांना कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांच्याच वस्ती समोरीलपत्रा शेड आहे त्यामदे आज रात्री लहान मुलं सोबत राहणार आहे,          
ठाकरवाडी वस्तीवर राहणाऱ्या सुमारे 45 घरांची सततच्या पावसामुळे घरामध्ये, पाणी साठलेले असून, घरांच्या भिंतीला चिरा पडले आहेत, संबंधित लोकांना राहण्याची देखील व्यवस्था नाही, आजची पूर्ण रात्र त्यांनी जागून बसून काढली, या वस्तीत दुसरी माळींची घटना घडते काय अशी शक्यता वाटत आहे, त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या वस्तीचे पुनर्वसन करावे, किंवा त्यांना पक्की घरे बांधून देण्यात यावी अशी मागणी होत आहे,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!