घरफोडी करणाऱ्या आरोपींचा हडपसर पोलिसांनी अवळ्या मुसक्या

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
        दिनांक - ०८/०८/२०२२ ता.हवेली
हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर ४ घरफोड्या / चोरीचे गुन्हे उघडकीस. १७ तोळे सोने ८०० ग्रॅम चांदी आणि आरोपींनी वापरलेली सँन्ट्रो
कार जप्त हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ७९१/२०२२ भा.दं.वि.क ४५४,४५७,३८० या दाखल गुन्ह्यात आरोपी नावे 
१) अक्षयसिंग बिरूसिंग जुनी वय १९ वर्ष रा. बिराजदारनगर वैदुवाडी हडपसर पुणे.यास गुन्हे शाखा युनिट-५ यांनी दिनांक २३/०७/२०२२ रोजी ताब्यात घेवून पुढील तपासकामी हडपसर तपासपथकाचे ताब्यात दिले. त्यानंतर गुन्ह्यातील इतर आरोपी
 २) जितसिंग ऊर्फ जितुसिंग राजपालसिंग टाक वय २६ वष रा. ११२ बिराजदारनगर, वैदुवाडी हडपसर पुणे 
३) लकिसींग गब्बरसिंग टाक वय १९ वर्ष रा.रामटेकडी डोंगरावर पाण्याचे टाकीजवळ हडपसर पुणे.यांना तुळजापुर पोलीस ठाणे गु.र.नं २७०/२०२२ भा.दं.वि.क ४०१,मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४,शस्त्र अधिनियम ४,२५ या गुन्ह्यातुन मा.न्यायालयाचे परवानगिने वर्ग करून घेवून उस्मानाबाद कारागृहातुन ताब्यात घेतले 
आरोपी क्रमांक १ याची दिनांक २४/०७/२०२२ ते दिनांक ०३/०८/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली तसेच आरोपी क्रमांक २ ते ३ यांची दिनांक २८/०७/२०२२ ते दिनांक ०३/०८/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होती.
हडपसर तपासपथकाने कौशल्याने आरोपीकडे पोलीस कोठडी मुदतीत तपास करून 
१) हडपसर पोलीस ठाणे गुरनं.७६६/२०२२ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८० 
२) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ७८८/२०२२ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८० 
३) हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ७९१/२०२२ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८० या गुन्ह्यातील चोरीस गेले सोन्या-चांदीचे दागिन्यांमधिल १७३.२४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७२८ ग्रॅम वजनाची चांदी असा किं.रू ८,९६,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच आरोपींकडून हडपसर पोलीस ठाणे गुरनं. ९४०/२०२२ भा.दं.वि.कलम ३७९,३४ मधिल चोरीस गेलेली सँन्ट्रो कार किं.रू ३,००,०००/- ची जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
तपासपथकाने आज रोजी पर्यंत एकुण ११.९६ लाख रूपयाचे सोन्याचे दागिने आणि सँन्ट्रो कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
      सदरची कामगिरी ही मा अप्पर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग पुणे नामदेव चव्हाण व मा.पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर,  नम्रता पाटील, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर अरविंद गोकुळे , पो.नि.(गुन्हे).दिगंगर शिंदे पो.नि.(गुन्हे) विश्वास डगळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे,पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार,सुशील लोणकर,अविनाश गोसावी,संदीप राठोड,अंकुश बनसुडे,सचिन जाधव,शाहीद शेख,प्रशांत दुधाळ निखील पवार,प्रशांत टोणपे,सचिन गोरखे,सुरज कुंभार भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे,अतुल पंधरकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!