शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या वतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन करण्यात आले.
क्रांती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रशालेतील बँड पथकामार्फत तसेच सर्व विद्यार्थ्यांची मिळून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात बँड पथकामार्फत मिरवणूकही काढण्यात आली.
याप्रसंगी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. यावेळी माजी सैनिक आनंदराव ढमढेरे, तळेगावच्या सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी सायली मुळे व यश ससाने या विद्यार्थ्यांनी हुतात्मा पिंगळे यांच्या विषयी माहिती सांगितली. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, संदीप ढमढेरे विजय ढमढेरे, तलाठी भाऊसाहेब बराटे, राजेंद्र करेकर, तळेगाव येथील माजी सैनिक तसेच ग्रामस्थ व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी आढाव यांनी केले.