लोणी काळभोर अनिकेत मुळीक
अवघ्या ५ वर्षीय बलात्कार करणारा ऋषिकेश दत्ता गिरी (वय.२५ रा.एमआयटी कॉलेज, लोणी काळभोर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार पिडीत मुलीची आई नोकरीस दुसऱ्या जिल्हात असल्याने, पिडीत मुलगी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका छोट्या गावात पिडीत मुलीच्या आईच्या जवळच्या नातेवाईकाकडे राहते. पिडीत मुलीच्या आईचे नातेवाईक व आरोपी याची ओळख असल्याने, आरोपी अधुन मधुन संबधित नातेवाईकाकडे येजा करत होता. पिडीत मुलगी राहत असलेले कुटुंबही दिवसभर कामाला जात असल्याचा फायदा उठवत, आरोपी याने मागिल वर्षभराच्या काळात पिडीत मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर आरोपी याने पिडीत मुलीला आईला जिवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलगी गप्प राहायला सागितले. पिडीत मुलीच्या आईला कामावरुन काही दिवसाची सट्टी मिळाली. पिडीत मुलीची आई सुट्टीसाठी मुलीला घेऊन तिच्या मुळगावातील घरी गेली. तीन दिवसापुर्वी आई मुलीला अंघोळ घालत असताना, मुलगी विशीष्ठ वेळी रडत असल्याने आईला मुलीच्या हालचालीबाबत संशय आला. यावर आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले असता, वरील संतापजनक प्रकार सांगितला. आरोपी हा मागिल अनेक दिवसापासुन लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने दिली. पिडीत मुलीच्या आईने थेट लोणी काळभोर पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेबद्दल लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.