सुनील भंडारे पाटील
गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करित असताना, बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, (पुणे) येथे दोन व्यक्ती संशयित रित्या उभे असुन त्यांचेजवळ (एम.डी) नावाचे अंमली पदार्थ असुन ते विक्री करीत आहेत.
सदरबाबत बातमी मिळाल्याने ,गणेश माने पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांनी स्वतः पोलीस पथकासह हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे येथे सापळा रचुन व्यक्ती नाव १) विराज इंद्रकांत छाडवा वय ३२ वर्ष रा. हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे २) जयेश भारत कोटियाना वय २० वर्षे रा. तिरुपती लॉन्स, टिंगरेनगर, पुणे यांना ताब्यात घेवून पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २,१०,९५०/- रूपये किंमतीचे ६ ग्रॅम ९३० मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ दोन मोबाईल, स्वयंचलित बॅटरी वरील वजन काटा मुद्देमाल जप्त करून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. ३४३/२०२२ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१(क) २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्हयामध्ये वर नमूद इसमांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, मा.सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ नारायण शिरगावंकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन घाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे व चालक पो.ना. सुहास तांबेकर यांनी केली आहे,