शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत मातेचे पूजन करण्यात आले. भारत मातेची आरती प्रशालेतील सर्व पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी म्हणत भारत मातेला वंदन केले. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्रशालेचे माजी शिक्षक श्री गुलाबराव गवळे सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रशाले तील नववी ब च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशालेच्या उपशिक्षिका सौ अर्चना गोरे यांनी केली. प्रशालेची विद्यार्थिनी तनुजा मराठे व आर्यन परदेशी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे तसेच विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाजी आढाव यांनी आभार मानले.