गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांची अफलातून कामगिरी

Bharari News
0

गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांची अफलातून कामगिरी 

विनापरवाना पिस्टल बाळगणारा आरोपी कडुन ३ पिस्टल केले जप्त, आरोपी जेरबंद

सुनील भंडारे पाटील 
         पुणे शहरामध्ये विनापरवाना बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्रे बाळगणे, विक्री करणे व त्याचा वापर करुन गंभीर गुन्हे करणे, त्या वाढत्या गुन्हेगारीस वेळीच प्रतिबंध व्हावा याकरिता मोहिम राबवून कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी आदेश दिल्याने त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करित असताना,     
यांना गोपनिय बातमीदारा कडुन बातमी मिळाली कि, गुंजन टॉकीज समोरील हिंदू स्मशानभुमि, येरवडा, पुणे येथे एक इसम पिस्टल घेऊन विक्रीसाठी थांबलेला आहे. त्याने अंगात निळे रेघांचा फुलबाहीचा शर्ट व निळया रंगाची जिन्स घातलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरच्या बातमी नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुंजन टॉकीज समोरील हिंदु स्मशानभूमि, येरवडा येथे सापळा रचून शिताफिने आरोपीचे नाव राहुल रोहिदास जाधव वय ३१ वर्षे रा. भगवा झेंडा चौक, स.नं. १२ लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे यास ताब्यात घेतले. तेव्हा त्याचे ताब्यातुन १ पिस्टल व १ काडतुस (३०,४००/- रुपये किंमतीचे) असे बेकायदेशिर रित्या बाळगले म्हणुन जप्त करण्यात आलेले आहे व आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं ३५५ / २०२२ आर्म अॅक्ट कलम ३.५ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,गुन्हयात आरोपीस अटक करुन आरोपीने बेकायदेशिर विक्रीसाठी घरात लपवुन ठेवलेली आणखी २ पिस्टल व २ काडतुस (६०,८००/- रुपये किंमतीचे ) जप्त करण्यात आलेली आहेत. अशी एकुण ३ पिस्टल व ३ काडतुस (९१,२०० /- रुपये किंमतीचे) जप्त करण्यात आलेली आहेत. नमुद गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ६ हे करीत आहेत...
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, मा. राहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२  नारायण शिरगावंकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन घाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे व चालक पो.ना. सुहास तांबेकर यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!