शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे जय भवानी तरुण मंडळ व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून नंतर तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत मध्ये अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून सभा घेण्यात आली. या कार्यक्रमास विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, ग्रामपंचायतचे माजी सदस्य महेश भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, संतोष ढमढेरे, जावेद बागवान, आरपीआय तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, शिरुर बाजार समितीचे संचालक ॲड. सुदीप गुंदेचा, ग्रामविकास अधिकारी गोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य सुनील ढमढेरे, माऊली आल्हाट ,बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष बापूसाहेब कुदळे, राजेंद्र करेकर तसेच जय भवानी तरुण मंडळ ,सिद्धार्थ विकास तरुण मंडळ, जय मल्हार तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ व भीमाशंकर तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विकास सोसायटीचे संचालक अशोकराव शेलार, समितीचे अध्यक्ष दशरथ शेलार, कार्याध्यक्ष मयूर शेलार, विशाल अवचिते, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट शेलार, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजार मैदान येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे अभिवादन सभेचे आयोजन केलेले होते. याप्रसंगी संतोष शेलार ,श्री मांढरे ,नवनाथ कांबळे ,अशोक शेलार व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त केले. जावेदभाई बागवान यांनी आभार मानले,