सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथील जागृत देवस्थान श्री नरेश्वर मंदिर येथे एका शिवभक्ताने नुकत्याच झालेल्या नागपंचमीच्या सणानिमित्त दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग अर्पण केले,
सणसवाडी गावचे पुरातन मंदिर म्हणून गावच्या पश्चिम भागात डोंगरावर स्थित असलेले नरेश्वर मंदिर म्हणजे पंचक्रोशीतील जागृत श्रद्धास्थान या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, निसर्गाच्या दाट सौंदर्यामध्ये अतुलनीय असे मंदिर भक्तांना नेहमी आकर्षित करीत आहे, या मंदिरा चे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचा नेहमी प्रयत्न असतो, श्री नरेश्वर देवावरील श्रद्धा जपत एका भाविक भक्ताने तब्बल दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग मंदिराचे पुजारी दरेकर महाराज यांच्या हस्ते, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री पंडीतआप्पा दरेकर ,सावता परिषद पुणे जिल्हाध्यक्ष श्री गोरख नाना भुजबळ . ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ताभाऊ हरगुडे ,सणसवाडी वि का सेवा सह सोसायटी मा. चेअरमन श्री गोरक्षनाथ दरेकर. मानवाधिकार एवं सामाजिक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य सचिव विकासबाप्पु काळुराम हरगुडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले, हे शिवलिंग सणासुदीच्या काळात भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सध्या मंदिराच्या जिर्णधाराचे काम चालू असून भाविक भक्तांनी मदत करण्याचे आवाहन पंडित आप्पा दरेकर, गोरख भुजबळ यांनी केले आहे,