सुनील भंडारे पाटील
धर्मपीठ, शक्तीपीठ, बलिदानपीठ, प्रेरणास्थान, श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (तालुका शिरूर ) येथील श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा विकासासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे, परंतु या आराखड्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती यांना विचारात घेतले नाही, या आराखड्यामध्ये विचारात घ्यावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे,
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी विकासासाठी राज्य शासनाने सुमारे 200 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, त्या संदर्भातला आराखडा देखील तयार करण्यात आला असून, समाधीस्थळी गेले 26 वर्ष समितीच्या माध्यमातून जीर्णोद्धारासाठी सेवा केली आहे, परंतु समितीच काय ग्रामस्थांना देखील आराखडा तयार करताना विचारात घेतले नाही ही बाब आश्चर्यकारक आहे, शिवाय याबाबतीत कुठलीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांना व समितीला कल्पना व विचार मांडण्याची संधी द्यावी, तसेच स्वराज्य रक्षक हा शब्द छत्रपतींच्या कार्याचे अवमूल्यन करणारआहे, कृपया याची नोंद घ्यावी व सुधारणा करावी असे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे, यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष मिलिंद भाऊ एकबोटे, संचालक शांताराम भंडारे, सचिन भंडारे, आदी उपस्थित होते,