सुनील भंडारे पाटील
लोणीकंद (तालुका हवेली ) ग्रामपंचायत वर प्रदीप दादा कंद यांच्या पॅनलने 17 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे,
17 सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीवर, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 17 जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या, उरलेल्या 6 जागांसाठी ची निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आज शुक्रवार तारीख 5 रोजी निकाल लागला, त्यामध्ये प्रदीप दादा कंद यांच्या पॅनलने बाजी मारत 6 जागा जिंकल्या, या निवडणुकीमध्ये कुठल्याही विरोधी पॅनलला संधीच मिळाली नाही, , एकही जागा लढवता आली नाही,
त्यामुळे एकंदरीत लढून झालेल्या तीन वार्डमधील उमेदवार देखील एकाच पॅनलचे होते, जो निवडून येईल तो आपला अशा पद्धतीचे राजकारण पंचक्रोशीत पहिल्यांदाच लोणीकंद ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले,2,3 आणि 6 या वार्ड मध्ये राहिलेल्या एकूण 6 जागेसाठी निवडणूक घेतल्यानंतर निकाल लागला, उर्वरित वार्डमध्ये 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या, अशा पद्धतीने लोणीकंद ग्रामपंचायतवर प्रदीप दादा कंद यांच्या सोमेश्वर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवनाथ कारंडे यांनी काम पाहिले,
प्रदीप भाऊ कंद यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, गावच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न चालू होता, बरेचसे जागा आम्ही बिनविरोध केल्या होत्या, संपूर्ण गाव बिनविरोध करण्यासाठी मी स्वतः हा निर्णय घेतला होता,
* निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे *
1) कंद नंदकुमार काळूराम
2) कंद सुधीर शिवाजी
3) शिंदे राहुल बाबासाहेब
4) कंद कावेरी सुनील
5) झुरुंगे प्रियंका योगेश
6) मगर अतुल अशोक,
* बिनविरोध निवडून आलेले उमेदवार*
१ : मोनिकाताई श्रीकांत भाऊ कंद
२; आशिष तुकाराम गायकवाड
३: सुजाता अमृत कंद
४: दिपाली महेश राऊत
५ : सोनाली गणेश जगताप
६: सागर बबन कंद
७ : सुप्रिया जय कंद
८: गौरव राजाराम झुरूंगे
९: ओंकार हनुमंत कंद
१०:सुलोचना दत्तात्रय झुरुगे
११:सरस्वती गंगधर दळवी