हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
एक महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पुणे आणि पुणे परिसरात वहातुक पोलिसांनी विविध वहानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.ही कारवाई व पोलिस कायदा सर्वसामान्य जनतेसाठीच आहे काय?असा प्रश्न स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की "सदरक्षणाय खलनिग्रहणाय"हे ब्रीवाक्य उराशी बाळगून पोलिस हे कर्तव्य दक्ष राहून सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आहोरात्र झगडत असतात. जनतेच्या रक्षणासाठी बिट व्हाइस,सेक्टर वाइस जीवाची पर्वा न करता, रात्र गस्त घालत जनता सुखाने झोपावी म्हणून स्वतः जागृत राहून कर्तव्य बजावत असतात. परंतु काही असेही आहेत की चीरीमिरी साठी सर्व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करत असतात.नुकतेच पुणे धनकवडी भागात लहान मूल आजारी पडले होते म्हणून उपचारासाठी हॉस्पिटलला घेऊन आले आणि बाजूलाच गाडी उभी करून उपचारासाठी घेऊन गेले आणि मुलाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याच्या आत हॉस्पिटल बाहेरची गाडी वाहतूक पोलिस घेऊन जातात.हा सर्व सामान्य नागरिकांना जाणून बुजून त्रास देण्यासारखेच आहे असे मला वाटते.याबाबत मी पोलिस उपायुक्त साहेब,मुख्यमंत्री साहेब, आणि उपमुख्यमंत्री साहेब यांचेकडे त्रास दायक ठरणारे काही वाहातुक पोलिस यांच्या बद्दल तक्रार करणार असल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि आधार हा पोलिस असतो.या विश्वासाला तडा जाऊ नये असे सर्वांनाचं वाटते. रक्षक कधीच भक्षक बनू नये असेही वाटते. सर्वसामान्य नागरिकांचा विघ्नहर्ता हा खाकी वर्दी असते.आणि ते नागरिकांच्या असेचे किरण असते.याकडेही काही निवडक आहेत त्यांनी लक्ष केंद्रित करावे.कारण एकामुळे चांगल्याकडे बोट जाऊ नये असे वाटते.