सुनील भंडारे पाटील
अत्यंत खडतर जीवनामध्ये प्रवास करत, शिक्षण आणि कामगिरीच्या जोरावर लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये रुजू असलेले दत्तात्रय नारायण गायकवाड यांची बढती होऊन त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी, पोलीस स्टेशन चंदन नगर पुणे येथे रुजू करण्यात आले,
विशेषता तक्रारदारांशी, इतरांशी मनमिळाऊ,प्रेमळ, वागणूक देणारे चांगले स्वभावाचे गायकवाड यांनी पोलीस खात्यातर्फे लोणीकंद चौकीला काम करताना गंभीर गुन्हे उघडकीस आणले, त्यांच्या कारकिर्दीत गुन्ह्यांचा तपास चांगल्या रीतीने करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, लोणीकंद पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार पदावर असताना त्यांनी सर्वांशी मैत्रीचे चांगले संबंध ठेवले, त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी व पोलीस खात्याने त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती केली, त्यांना चंदन नगर, पुणे पोलीस स्टेशन येथे रुजू करण्यात आले आहे, त्यांच्या या कामगिरीबद्दल, व बढती बद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनचा वर्षा होत आहे,