लोणी काळभोर अनिकेत मुळीक
पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश.
दि.१९/०८/२०२२.पुणे (ता.हवेली)
१)-पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात. तसेच विविध कारणांमुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्या कारणाने पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.
२ )-पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१), (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.
३)भाग्यश्री नवटके, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर वर नमूद अ.नं. २ च्या आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१). (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात *दिनांक २३/०८/२०२२ रोजी ००.०१ वा.पासून ते दिनांक ०५/०९/२०२२ रोजी २४.०० वा. १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.*
१) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
२) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर
नेणे, जमा करणे व तयार करणे.
३) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल
अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
४) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहनकरण.
५) मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे.
यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे,
कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीसअधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७(१), (३) विरूध्द वर्तन करणे.
४)- यादरम्यान शासन किंवा म.न.पा, आयुक्त, पुणे यांच्या कोरोना विषयक प्रतिबंधक उपाययोजना व मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदी याही या दरम्यान लागु राहतील.
५)- महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.
६)- वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठाच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.
७)- सदरचे आदेशाला जाहिररीत्या ठळक प्रसिध्दी द्यावी.
८)- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.
ठिकाण :- पुणे शहर. दिनांक,१०/०८/२०२२मा. पोलीस सह आयुक्त यांचे मान्यतेने(भग्यश्री नवटके) पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे