रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
येथील औद्योगिक वसाहतीमधील कल्याणी टेक्नोफोर्स लि.या कंपनीतील ९८,९६०/रु.किंमतीचे डाय , लोखंडी कट ब्लेड व फोर्जींग जॉंब अज्ञात चोरट्याने चोरून नेले असुन या बाबत कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री सचिन पंढरीनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली.
या बाबत रांजणगाव पोलीस स्टेशनला दि.९ आँगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे , पोलीस हवालदार विलास आंबेकर , ब्रह्मा पोवार यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असता सदरचा गुन्हा मागील तीन महिन्याचे कालावधीत घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असता या कालावधीतील कंपनीतील सी.सी.टी.व्हि फुटेज प्राप्त करून दररोज सदर फुटेजची पडताळणी करण्याचे काम चालू केले सदर फुटेजच्या आधारे एक महिद्रा पिकअप गाडीच्या संशयीत हालचाली कंपनीचे आवरत दिसून आल्याने तपास पथकातील सहा .फौज. दत्तात्रय शिंदे पो.कॉ.उमेश कोतवळ विजय शिंदे यांनी तपासाचे चक्रे अधिक गतिमान करून गोपनीय माहितीच्या आधारे कंपनीतील सिक्युरिटी गजानन हनुमंत दामले सध्या .रा. रांजणगाव ता .शिरूर जि.पुणे मुळ.रा पेठवडज ता कंधार जि नांदेड यास ताब्यात घेऊन तपास करण्यात आला. सदर गुन्ह्यातील माल हा पिकअप मधून आरोपी अमरनाथ विष्णू देव यादव सध्या रा कारेगाव ता. शिरूर जि. पुणे मुळ.रा गोविंदपुर उत्तर प्रदेश यांच्याशी सिक्युरिटी गजानन दाबले यांनी संगणमत करुन चोरला असल्याचे सांगितले आरोपी अमरनाथ यादव उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारी मध्ये असताना परतुर जिल्हा जालना येथील स्थानिक पोलीस स्टेशनचे पो. कॉ. सुनील हांडे , अमोल गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील आरोपींना कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
सदरची सदर कामगिरी पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख , शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे , विजय शिंदे ,उमेश कुतवळ , विलास आंबेकर , ब्रह्मा पोवार , राजेंद्र ढगे यांनी केली आहे सदर गुन्ह्याच्या पुढील तपास राजेंद्र ढगे हे करीत आहे