गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील निर्वी येथे गोकुळाष्टमी उत्सव साजरी करण्यात आली. गावातील भजनी मंडळांनी गावातून पालखीची मिरवणूक काढून ग्राम प्रदर्शना घातली. गोविंदा रे गोपाला , यशोदेच्या तान्ह्या बाळा, लाल ,लाल पागोटा गुलाबी शेला. यासह अनेक हिंदी ,मराठी गाण्यांवर दोन वर्षानंतर ठेका धरून निर्वी मध्ये गोविंदा मध्ये सळसळता उत्साह दिसून आला. कोरोनामुळे गेले दोन वर्ष दहीहंडी साजरी करण्यात आली नव्हती मात्र महामारीचे संकट कमी झाल्याने मोठ्या उत्साहाने आयोजन केले होते. ध्वजसेवक समिती तसेच निर्वी ग्रामस्थ यांनी संयुक्त गोपाल काल्यानिमित्ताने भगवान श्रीकृष्ण दहीहंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते त्यावेळी ध्वजसेवक समिती निर्वीच्या ध्वजसेवकांनी ३ थरांचे मनोरे रचून उत्साहाने दहीहंडी फोडली. या सोहळ्यामध्ये संस्थांचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते