बारामती विशेष प्रतिनिधी
शिर्सुफळ (तालुका बारामती) येथील श्री.विश्वकर्मा युवा प्रतिष्ठाणची बैठक संपन्न झाली.या बैठकीत रिक्त असलेल्या उपाध्यक्ष व सहखजिनदार पदाची निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी सर्वानुमते उपाध्यक्षपदी रणजित थोरात तर सहखजिनदारपदी संकेत मल्हारे यांची निवड करण्यात आली.
श्री.विश्वकर्मा युवा प्रतिष्ठाणची स्थापना झाल्यापासून समाज उपयोगी
अनेक उपक्रम राबविले जातात.ही एक रजिस्टर संस्था असून या प्रतिष्ठाण मार्फत
स्वच्छ्ता अभियान प्रकल्प राबवून गावचे कुलदैवत श्री.शिरसाई देवीच्या
परिसरातील परिसर स्वच्छ करून एक आदर्श प्रतिष्ठाण म्हणून ग्रामपंचायत
शिर्सुफळ मार्फत पुरस्कार मिळवला आहे.
दरवर्षी प्रभू श्री विश्वकर्मा देवाची जयंती साजरी करत असतात.या
माध्यमातून गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात.एकत्रित कुटुंब
पद्धत या ठिकाणी दिसत आहे.मंडळातील सर्व सदस्य एकमेकांचा आधार घेउन
प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करत आहे.
या निवडी
प्रसंगी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष वैभव थोरात,सल्लागार बंडूशेठ थोरात,बारामती
तालुका लोहार युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष बबन थोरात,गोपीनाथ थोरात,राजू
थोरात,बाळासाहेब थोरात,सुरेश थोरात,दिलीप थोरात,कार्याध्यक्ष दादा थोरात,
रोहन थोरात,वैभव राऊत,पवन थोरात,प्रथमेश थोरात,गौरव थोरात,गणेश थोरात,सागर
थोरात,प्रवीण चव्हाण,राजू थोरात,योगेश थोरात,सौरभ थोरात,निहार थोरात व
प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थित होते.
या
निवडीबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मा.सदस्य,आदर्श सरपंच आप्पासाहेब आटोळे,
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विजय थोरात,राहुल
थोरात यांनी दोघांचे अभिनंदन केले.