शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
वाबळेवाडी शाळेत कोथरूड येथील लायन्स क्लबकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम पाच विजेत्या विद्यार्थ्यांना माजी प्रांतपाल अभय शास्त्री व लायन्स क्लब कोथरूड येथील अध्यक्ष रविंद्र भोसले यांच्या हस्ते वृक्ष व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीत कोथरूड येथील लायन्स क्लबकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये माजी प्रांतपाल अभय शास्त्री व लायन्स क्लब कोथरूड येथील अध्यक्ष रविंद्र भोसले यांच्या हस्ते प्रथम पाच विजेत्या विद्यार्थ्यांना आंबा, चिकू, फणस, तुळस, कढीपत्ता, वड, पिंपळ आदी वृक्ष व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमात सहभागी २१८ विद्यार्थ्यांना वृक्ष देऊन ते जतन करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी सचिव विठ्ठल कुटे, खजिनदार केतन शिंदे, प्रकाश सुखात्मे, मिलिंद जोगळेकर, सुनिता चिटणीस, गिरीश गणात्रा, जसबीर कौर, सफला ओसवाल, अनुराधा शास्त्री, सविता रासोटे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये एकूण २१८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यात पाचवीतील युवराज नवनाथ भुजबळ, श्रद्धा सचिन नळकांडे, सई दत्तात्रेय साकोरे यांना प्रथम द्वितीय व तृतीय अशी अनुक्रमे पारितोषिके मिळाली. तर प्रयाग पांडुरंग राऊत व निधी राहुल भालशंकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इयत्ता सहावीतील स्वराली गोरक काळे व दिया अशोक थिटे यांना प्रथम श्रावणी गणेश थोरात हिला द्वितीय तर शार्दुल प्रशांत गवारी व अनुष्का भाऊसाहेब वाबळे हिस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर वैभवी संजय सोनकटाळे व प्रतिक्षा महादेव म्हेत्रे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सातवीतील आदिती बापू मोरे, वैष्णवी गणेश रणदिवे व मधुरा उत्तम काळे यांना प्रथम द्वितीय व तृतीय अशी अनुक्रमे पारितोषिके मिळाली. तर अपेक्षा जालिंदर वाबळे, दिशांत संदीप काळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. इयत्ता आठवीतील रिया सचिन वाबळे, प्रज्वल गोरक्ष तांबे, आश्लेषा नितीन भुजबळ यांना प्रथम द्वितीय व तृतीय अशी अनुक्रमे पारितोषिके मिळाली. तर समीक्षा उत्तम मासळकर, संस्कृती संतोष धुमाळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले तर संदीप गिते यांनी आभार मानले,