सासवड :प्रतिनिधी : बापू मुळीक
पिसे (ता.पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात गावच्या मीटिंगमध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने येथून पुढे सप्ताह ,गणपती,नवरात्र, यात्रा संदर्भात होणाऱ्या गावची विकासकामे कमिटीची मिटिंग होऊनच कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात येणार असल्याचा ठाम विश्वास सर्व ग्रामस्थांना
कमिटीच्या स्वरूपातून सर्वांगीण विकास काम करताना कोणताही निर्णय सरपंच घेऊ शकत नाही तर कमिटीचे निर्णय घेईल असे सर्व ग्रामस्थांना आश्वासन कमिटीच्या माध्यमातून पुरंदर तालुका युवा सेना समन्वयक गणेश मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पिसे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात प्रामुख्याने गणेश मुळीक ,रामदास (बाप्पू )मुळीक,पत्रकार बापू मुळीक ,माजी सरपंच ,माजी उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील,वि.वि.का.सो.चे चेअरमन,व्हॉइस चेअरमन,सदस्य,माजी ग्रा.सदस्य,गावातील हरिभक्त पारायण शंकनाथ महाराज यांच्या आशिर्वादातून पिसे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात खूप मोलाचे योगदान लाभले.आत्तापर्यंत गावात ग्रामपंचायत अंतर्गत रोडची कामे फिल्टर मशीन बसून पिण्याचे पाणी शंकनाथ महाराजांच्या सभामंडपाचे भूमिपूजन अमावषेला लक्ष्मी माता मंदिराचे कामकाज सुरु करणार .धनगर समाजाचे मंदिराचे काम दशक्रिया विधी घाटाचे काम लवकरात लवकर चालू करणार असल्याचे सरपंच रोहन मुळीक यांनी सांगितले.
पिसे गावातील कमिटी खालीलप्रमाणे:
सरपंच रोहन ना मुळीक,उद्योगपती संतोष ह मुळीक,पुरंदर तालुका युवासेना समन्वयक गणेश अ मुळीक,पत्रकार बापू रा मुळीक,दीपक ह मुळीक,शांताराम मा मुळीक,संतोष सु मुळीक,रामदास (बापू )मुळीक,सोमनाथ अ मुळीक,वैभव मुळीक,रवींद्र मुळीक,गोपीनाथ बा मुळीक,प्रकाश आ मुळीक,भुजंग गु मुळीक,भानुदास बा मुळीक,रजनीकांत विठ्ठल मुळीक,नवनाथ दा मुळीक,दिलीप उ मुळीक,विठ्ठल शी गिरीगोसावी,ज्ञानदेव ग मुळीक,भाऊसो रा ठोंबरे,अब्दुल पो सय्यद,प्रकाश ज मुळीक,गणेश बा सांगळे,योगेश मु मुळीक .