रांजणगाव गणपती मंदिर मुक्त द्वार दर्शनासाठी खुले

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
          भाद्रपद गणेश ऊत्सवा  निमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री क्षेत्र  गणपती येथील महागणपती द्वार यात्रेचा शुभारंभ रविवार  दिनांक २८ पासून होत आहे. दरम्यान पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिर मुक्तद्वार दर्शनास  भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या विश्वसांनी दिली.
  मागील दोन वर्ष कोरोना काळात याञा बंद असल्यामुळे चालू वर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात असे आवाहन तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी केले. 
  रविवार ते बुधवार पर्यंत पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांना  गणपतीच्या मूर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. भाद्रपद गणेशोत्सव यंदा २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादरम्यान भाविकांना रविवार ते बुधवार पर्यंत श्री महागणपतीच्या मूर्तीला प्रत्यक्ष हाताने स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळणार असल्याचे विश्वस्त नारायण पाचुंदकर यांनी सांगितले.       प्रथेनुसार भाद्रपद गणेश उत्सवात श्री महागणपतीच्या चारही दिशांना असलेल्या बहीणींना  आणण्यासाठी पालखीद्वारे द्वारयाञा काढली जाणार असल्याचे विश्वस्त डॉक्टर संतोष दुंडे  यांनी सांगितले. यात्राकाळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना  सुविधा देण्यात आले आहेत या दरम्यान भाविकांना  मंडप व्यवस्था ,  वाहनतळ , पिण्याच्या पाण्याची सुविधा , हिरकणी कक्ष आदी सुविधा देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ व पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे    ग्रामस्थ व विश्वस्त मंडळ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये भाविकांसाठी  आवश्यक त्या सूचना व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले.
 पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे  यांनी मंदिर परिसराची पाहणी करून रांजणगाव देवस्थानचे विश्वस्त यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.याप्रसंगी शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे , तालुका आरोग्य अधिकारी डाँ. दामोदर मोरे , महावितरणचे सहाय्यक अभियंता डी.पी.पाचुंदकर , अग्निशमन अधिकारी  पी. व्ही. गुंड , ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख ,  सरपंच सर्जेराव खेडकर , शिरुर-आंबेगाव  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर-पाटील , पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर-पाटील , दत्ताञय पाचुंदकर-पाटील , देवस्थानचे माजी अध्यक्ष दत्तोबा लांडे , बबनराव कुटे,    देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त  अँड  विजयराज दरेकर ,   प्राध्यापक नारायण पाचुंदकर ,  सचिव डॉक्टर संतोष दुंडे , व्यवस्थापक  बाळासाहेब गो-हे , नामदेव  पाचुंदकर-पाटील , हर्षल जाधव , आकाश बत्ते , आण्णा शेळके , बाळासाहेब  संदीपस्त आदी उपस्थित होते.
              दरम्यान  महागणपती मंदिरामध्ये भाद्रपद महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी या संपूर्ण तयारीची पाहणी करून आढावा घेतला. दोन वर्षांनंतर भाद्रपद महोत्सव अतिशय उत्साहात साजरा व भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुशंगाने या सर्व तयारी ची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे विश्‍वस्त प्राध्यापक नारायण  पाचुंदकर-पाटील , ग्रामपंचायत सदस्य विलास अडसूळ ,  माजी ग्रामपंचायत सदस्य दादामामा शेळके ,  माजी विश्वस्त राजेंद्र देव रमेश नाणेकर , पोलीस कर्मचारी  ब्रम्हा पवार , संतोष औटी आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!