सुनील भंडारे पाटील
पुणे - नगर महामार्ग दिवसेंदिवस बनत चाललाय मृत्यूचा सापळा,
संबंधित महामार्गावरील मलठण फाटा शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे अज्ञात
वाहनाने, पायी रस्ता ओलांडत असताना एका युवकाला धडक दिल्याने मृत्यू झाला,
शुभम दत्तात्रय दिवेकर (वय 23) मूळ
राहणार भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे, सध्या राहणार बजरंगवाडी
शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे, असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे
नाव व पत्ता असून, या संदर्भात रवींद्र केशव शिवले वय 32 राहणार वढु
बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे ,यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे
फिर्याद दिली आहे, आज 28,8,2022 रोजी रात्री 1:00 वाजता, शुभम ची आई शारदा
दिवेकर यांनी भाऊ रवींद्र शिवले यांना फोन करून सांगितले की मलठण फाटा
शिक्रापूर येथे शुभम चा अपघात झाला आहे, तू त्या ठिकाणी जा,
त्यानंतर
रवींद्र शिवले, योगेश शिवले, गणेश शिवले घटनास्थळी गेले असता, त्यांना
समजले की, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शुभम गंभीर जखमी झाला असून त्याला
खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वी मयत
झाल्याचे सांगितले, अज्ञात वाहन व चालकाने वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्ष
करून, बेदरकारपणे, हाय गईने वाहन चालून, गुन्हा केल्याने त्याच्या विरोधात
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून,पुढील तपास पोलीस
निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करत
आहेत,
पुणे नगर महामार्ग
दिवसेंदिवस बनत चाललाय मृत्यूचा सापळा, रस्त्याचे काम स्टार झाल्याने,
बेफाम वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे घडत आहेत अनेक अपघात, या महिन्यात घडले
आहेत अनेक अपघात, अनेकांना गमवावे लागले आहेत प्राण, वेगावर मर्यादा,
बेशिस्त वाहन चालकांना आळा बसणे गरजेचे आहे, अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी
उपाय योजना राबवाव्यात अपघात ग्रस्त कुटुंबांचा आक्रोश,