सुनील भंडारे पाटील
लोणी काळभोर तालुका हवेली येथे आज सकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला,
पुणे सोलापूर मार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे, या मार्गावर आत्तापर्यंत अनेक अपघात घडले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, आज शनिवार ता 20 रोजी सकाळी साडेसात वाजता दोन मुली दुचाकीवरून शाळेत जात असताना कदम वाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी काळभोर येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने या दोन्ही मुलींना अक्षरशः कंटेनर ने चिरडून टाकले,
त्यात दोघी सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला, छकुली कुमार शितोळे वय 17, राजश्री कुमार शितोळे वय 10, दोघीही राहणार कवडीपाठ कदम वाक वस्ती, असे या अपघातात मृत्यू पावलेल्या मुलींची नावे आहेत, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, लोणी काळभोर मध्ये घडलेले या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,