दहीहंडी उत्सवात गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न

Bharari News
0
अनिकेत मुळीक लोणी काळभोर
     पुणे, वडगाव (ता.हवेली) दहीहंडीच्या उत्सवात नाचत असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर शस्त्राने वार केले, तर एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण  केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री वडगाव भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
ओंकार लोहकरे असे गोळीबार केलेल्या आरोपीचे नाव आहे. तुकाईनगर परिसरात असणाऱ्या कॅनॉलशेजारील रस्त्यावर रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, वडगावमधील महादेवनगर येथील वेताळ मित्र मंडळ दहीहंडी उत्सवात शुभम जयराज मोरे (रा. महादेव नगर, वडगाव) हा त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. यावेळी आरोपी चेतन ढेबे, ओंकार लोहकरे, अनुराग चांदणे, ज्ञानेश्वर जाधव, बाला धेबे, साहिल उघडे, वैभव साबळे आणि त्यांचे सात ते आठ मित्र यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोरे याला मारहाण केली. लोहकरे याने त्याच्या जवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!