अनिकेत मुळीक लोणी काळभोर
लष्कर पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग नंबर १२/२०२२ मधील खबर देणार माधव पाटील वय ५३ वर्षे रा.मु.पो.चिंचाळा ता.बिलोरी जि.नांदेड यांनी दिनांक १७/०८/२०२२ रोजी लष्कर पो.स्टे. येथे येवुन समक्ष कळविले की,दिनांक १६/०८/२०२२ रोजी त्यांची डॉ.पत्नी यांनी दवाखान्यातुन त्यांचे मुलाला फोन करुन सांगितले की,मला शोधण्याचा प्रयत्न करु नका असे सांगुन फोन कट केला तसेच दोन चिठ्ठया सुध्दा घरी सापडल्या त्यामध्ये “मला दुर्धर आजार झाला असून त्यावर होणार खर्च व अधी मी केलेले कर्ज यामुळे होणार अर्थिक भुर्दंड यामुळे मी मानसिक तणावात आहे” असे लिहुन निघून गेल्या.
सदर मिसिंग महिलेचा लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कदम यांचे मार्गदर्शना खालील तपास पथकाचे सहा. पोलीस निरिक्षक गायकवाड, पोलीस उप-निरिक्षक कांबळे,पो.हवा ५६७९ कदम, पो.ना अमोल गायकवाड ,पो.ना गणेश कोळी, पोना समिर तांबोळी, पो हवा कैलास चव्हाण असे मिळुन तात्काळ शोधकामी रवाना होवुन सदर महिलेचा मोबाइल नंबर बंद असताना सुध्दा नंबरचे तांत्रिक विश्लेषण पोहवा ३४६७/मंगेश बो-हाडे, यांनी केले त्याचे सहाय्याने फरासखाना, समर्थ भागातील कमलेश,नर्तीकी,चॉईस,राधीका रॉयल,दिपा हॉटेल चेक केले असता सदर महिला हया हॉटेल पराग नानापेठ पुणे येथे मिळुन आल्याने, ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन मा वरिष्ठ पोलीस निरिक्षक कदम यांचे समोर हजर केले असता तीने हकिगत सांगितली तेव्हा तीचे समुपदेशन करुन तीचे मनपरिर्वतन करुन सकारात्मक ऊर्जा निर्माण करुन तसेच मुलांचा व कुटुंबाचा विचार करावा व मुत्यु हा उपाय होऊ शकत नाही सध्या अधुनिक उपचार पध्दती व विविध सेवा भावी संस्था मार्फत केली जाणारी ट्रिटमेन्ट बाबत सविस्तर माहीती दिली तसेच वपोनि याचे मेहुणे डॉ.(सर्जन) सतिश पवार यांचेशी बोलणे करुन देवुन उपचारासाठी सहज उपाय आहे. यांची जाणीव करुन दिली व डॉ.महिलेस त्यांचे पतीचे ताब्यात दिले.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त .सागर पाटील, परि. २, मा.सहा. पोलीस आयक्त आर एन राजे, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांचे नेतृत्वाखाली, सहा पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड, पोलीस उप निरीक्षक कांबळे, पोहवा५६७९/कदम, पो हवा कैलास चव्हाण, पोहवा ३४६७/मंगेश बो-हाडे, पोना ७८९१/कोळी, पोना ७६६१/ तांबोळी,पो ना अमोल गायकवाड यांनी केली आहे.