शिरूर विशेष प्रतिनिधी
आज शुक्रवार तारीख .०५ / ०८ / २०२२ रोजी रात्री एकनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फती बातमी मिळाली की , पांढ-या रंगाच्या हयुंडाई आय . २० कार नं . एम . एच . १४ एफ.जी. ९ ८ ९ ६ यामध्ये अवैधरित्या गुटखासाठा वाहतुक होत असुन सदरची कार अहमदनगर बाजुकडुन पुणे बाजुकडे जात आहे .
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो स ई पाटील यांनी याबाबत पो.नि. सुरेशकुमार राऊत यांना माहिती दिली असता . पोलीस निरीक्षक राउत यांनी लागलीच एक पोलीस पथक तयार करून कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले . पोलीस पथक सम्राट हॉटेल समोर अहमदनगर ते पुणे हायवे रोडवर ता . शिरूर जि . पुणे येथे सापळा लावुन थांबलेले असताना बातमी मिळालेल्या वर्णनाची एक पांढ - या रंगाची हयुंडाई कंपनीची आय २० कार नं . एम . एच . १४ एफ.जी. ९ ८ ९ ६ ही आल्याचे तीस थांबुन पंचासमक्ष तीचे पाहणी केली असता . त्यामध्ये तीन व्यक्ती बसलेले होते त्यांनी त्यांचे नावे १ ) नितीन हिरालाल छाजड वय ५६ वर्ष , रा . सेक्टर ३५/३ , दत्तवाडी , शितल लॉन्ड्रीसमोर , आकुर्डी , पुणे ३५२ ) संगमेश माणिकाप्पा हलींगे वय ३४ वर्ष , रा . मनिकप्पा , आनंदवाडी , मिरखळ , बिदर कर्नाटक सध्या रा . सेक्टर १६ , ओसिस परदेशी सोसायटी , जाधववाडी , चिखली , पुणे ३५ ३ ) एक विधी संघर्ष ग्रस्त बालक असे सांगीतली त्या कारची पाहणी करता कारच्या डिक्की मध्ये ३२,१२८ / - रू किमंतीचा विमलपान मसाला , व्हि १ कंपनीचे सुंगंधीत तंबाखु असा गुटखा व ३,००,००० / -रू किंमतीची हयुंडाई कंपनीची आय २० कार नं . एम . एच . १४ एफ.जी. ९ ८ ९ ६ असा एकुण ३,३२,१२८ / - रू चा माल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे . त्याबाबत टी.टी. जाधव पोलीस अंमलदार ब.नं. ७१५ नेमणुक शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या तक्रारी वरून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन त्यांना मा . हुए कोर्टाने ०६/०८/२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे . गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत . वरील कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक . अभिनव देशमुख सो , मा . अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे सेप , पुणे व मा . उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी सोो , शिरूर यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , शिरूर पोलीस ठाणे , पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील , सहा . फौजदार जी . एन . देशमाने , पोना बाळु भवर , पोअं . विनोद काळे , राजेंद्र गोपाळे व टी . टी . जाधव या टिमने केलेली आहे . यापुढे ही अश्याच प्रकारे गुटखा वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याने नागरींकानी गुटखा वाहतुक , विक्री किंवा त्याचा साठा जवळ बाळगु नये असे शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी नागरींकाना आव्हान केलेले आहे .