गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय चांडोली बुद्रुक ( तालुका आंबेगाव) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचार मंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक .बालाजी कांबळे साहेब,आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे सर,अटल बिहारी वाजपेयी विचार मंच उपाध्यक्ष गणेश भाऊ बाणखेले, आरोग्यदूत सुशांत उर्फ बाबूशेठ थोरात,विद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ काळे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक मुख्याध्यापिका आजाब मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा,महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या स्पर्धा परीक्षांची रूपरेषा स्पष्ट करताना या परीक्षांची पूर्वतयारी शालेय स्तरापासूनच करावी.तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा, राज्य,राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना प्रशासनात काम करण्यासाठी संधी मिळते, विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्न पहावीत व ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी कठोर मेहनत करावी.
पोलीस प्रशासनातील कामाचे कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अभ्यास व शारीरिक व्यायामाच्या जोरावर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पहिल्याच प्रयत्नात पोलीस निरीक्षक झालो असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे सर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनातील कामकाज समजून घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मा कांबळे साहेब यांच्याशी संवाद साधला.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अटल बिहारी वाजपेयी विचारमंचच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये करियर मार्गदर्शन, महसूल कामकाजासंदर्भात मार्गदर्शन,सर्पदंशाच्या वेळेला प्राथमिक उपाययोजना,वैयक्तिक आरोग्य संदर्भात घ्यावयाची काळजी याविषयी विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे .डॉ.ताराचंद कराळे सर यांनी सांगितले तसेच चांडोली बुद्रुक शाळेमध्ये पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले,यावेळी ३९४ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.सुशांत उर्फ बाबू शेठ थोरात यांनी प्रास्ताविक केले,तर केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन केले व दशरथ काळे सर यांनी आभार मानले.