रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती (ता शिरूर ) येथील औद्योगिक वसाहतीमधील ब्रिटानिया कंपनीतील चोरी प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी आठ वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या बाबत कंपनीचे अधिकारी मतीन अली सय्यद वय ४० वर्षे व्यवसाय नोकरी राहणार शिरूर सुभाष चौक तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जुलै ते २७ जुलै या कालावधीत ब्रिटानिया कंपनीत माल वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांनी कंपनीमधील १,१९,६००/-रु.किंमतीचे ९२० कि.ग्रॅ.वजनाच्या पाम ऑईलची परस्पर विक्री केली आहे. या बाबत
चालक संतोष एम एच ४३ वाय ६७६५ ,
चालक राकेश व ओम ट्रान्सपोर्टचे टॅंकर क्र. एम एच ४३ वाय ४३४४ , चालक शिवधारी एम एच ०४ ३७८५ , चालक संजय एम एच ०४ एफ यु ४३४९ , चालक विरेद्र शुक्ला , एम एच ४६ एम ३७४९ , चालक अजय एम एच ४३ इ ३६८८ , चालक राम शुक्ला एम एच ०४ एच डी ७१८५ , नितीन भगवान वागमोडे या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.