सुनील भंडारे पाटील
शिरूर आणि हवेली तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे लोकप्रिय माजी आमदार बाबुराव पाचरणे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी शिरूर हवेलीच्या जनतेची खूप सेवा केलेली आहे,
त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून बिघडल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शिरूर येथील बाबुराव नगर मध्ये त्यांच्या राहत्या घरी वैद्यकीय उपचार चालू आहे, समर्थकांनी सतत ये जा व गर्दी केली असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी व आजारपणावर मात करण्यासाठी रांजणगाव येथे महागणपतीला महाआरती करून सर्व शिरूर हवेलीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाआरतीचे आयोजन केले होते