सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेली चे लोकप्रिय आमदार बाबुराव पाचरणे यांचे निधन झाले,
पाचरणे यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अनेक वर्ष काम केलेले होते, त्यांच्या
निधनाची बातमी समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लेखी
पत्राद्वारे दुःख व्यक्त केले, पाचरणे
यांचा राजकीय कारकीर्दीतील दरारा अगदी शिरूर तालुका पासून दिल्लीपर्यंत
होता, त्यांच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप मोठी पोकळी
निर्माण झाली आहे,
निधनाचे दुःख पार देशाचे पंतप्रधान मोदी यांना झाले असून
त्यांनी श्रीमती मालती बाबुराव पाचरणे यांचे नावे पत्राद्वारे शोक, दुःख, व
सांत्वन केले आहे, पत्राच्या मजकुरामध्ये " बाबुराव पाचरणे यांच्या
निधनाची बातमी कळताच मला अतिव दुःख झाले दुःखाच्या प्रसंगी कुटुंबया प्रति
हार्दिक संवेदना, पाचरणे यांच्याकडे सेवा करण्याची अखंड तळमळ होती, समाज
त्यांचे सार्वजनिक जीवनात ते वचनबद्ध आणि बोलके राहिले, लोककेंद्रीय समस्या
लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न, दैनिक आव्हाने सोडवणे
नेहमीच स्मरण राहील, पाचरणे हे कुटुंबासाठी शक्ती स्तंभ होते, यापुढे
तुमच्या सोबत ते शारीरिक दृष्ट्या उपस्थित नाही, परंतु त्यांच्या आदर्श आणि
मूल्य कुटुंबाला मार्गदर्शन करत राहतील, कुटुंबातील समस्यांना धीर देवो
अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि त्यांच्या चाहत्यांना हे नुकसान सहन
करावे लागेल, दिवंगत आत्म्याला शांती लाभो, ओम शांती " अशा मजकुराचे पत्र
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी श्रीमती मालती पाचरणे यांच्या नावे
पाठवून आपला शोक व श्रद्धांजली व्यक्त केली आहे, यावरून माजी आमदार पाचरणे
यांच्या दुःखद निधनाच्या वेदना त्यांचे कुटुंब नव्हे तर तालुका जिल्हा
राज्य, देशाच्या राजधानी पर्यंत पोहोचले आहेत,