सणसवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी दत्तात्रय हरगुडे बिनविरोध

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील 

            सणसवाडी (तालुका शिरूर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दत्तात्रय नामदेव हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड् अशोकबापू पवार यांनी हरगुडे यांचा सत्कार केला.       
पुणे नगर महामार्गावर महत्त्वाची समजली जाणारी सणसवाडी ग्रामपंचायत, मोठी रहदारी, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्र असणारे सणसवाडी गाव बहु चर्चेत आहे, ग्रामपंचायतचे मावळते उपसरपंच सागर दरेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी आज एकमेव अर्ज आल्याने दत्तात्रय हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, निवडीनंतर मिरवणूक, गुलालाची उधळण, फुलांची उधळण, ढोल ताशांच्या कडाडात मिरवणूक काढण्यात आली, याप्रसंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते, आमदार पवार यांच्या हस्ते सत्कार करून, हरगुडे यांना खुर्चीवर विराजमान करण्यात आले, उपस्थितांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला, अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले,     
यावेळी सरपंच संगीता हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर, खरेदी विक्रीचे सभापती राजेंद्र नरवडे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी उपसभापती दत्ताभाऊ हरगुडे, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम सोनवणे, माजी सरपंच स्वप्निल गायकवाड , माजी सरपंच युवराज दरेकर, मा उपसरपंच सागर दरेकर, नवनाथ दरेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे, शशिकला सातपुते, रूपाली दरेकर, राजेंद्र दरेकर, दिपाली हरगुडे, रामदास दरेकर, ललिता दरेकर, राहुल हरगुडे, स्नेहल भुजबळ, विजयराज दरेकर, सुवर्णा दरेकर,व मोठ्या संख्येने मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!