राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिक्रापूर मधील खेळाडूंचे यश

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
           वाघोली येथे झालेल्या शोतोकान ग्लोबल जपान कराटे अकॅडमी आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शिक्रापूर मधील इंद्रप्रस्थ कराटे क्लासच्या २६ खेळाडूंनी पदकांची कमाई केली.   
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :- *कराटे कुमिते (फाईट) प्रकार : *सुवर्ण पदक :-* विश्वजीत सासवडे, अद्वैत गवारे, साईरंग काकडे, साची थोरवे, शरद सेन. *रौप्य पदक:-* पूर्वा जकाते, अर्चित फापाळे, कृष्णा गोडसे, विशाल माटोळे, अजिंक्य भंडारे, यशराज कदम, जयदत्त ढेरे. *कांस्य पदक:-* शौर्य उमासरे, अयान शेख, पूर्वा निकम.
 तसेच कराटे काता प्रकारात देखील या सर्व खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. सर्व विजयी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सोमनाथ अभंग व विजय अघाव यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजेत्या खेळाडूंचे उद्योजक मंगेश सासवडे, जोस्त्ना जकाते, सीताराम चव्हाण यांनी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!