सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
जोरदार पावसामुळे कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे गुरवारी (दि. ११) रस्त्यालगत असलेले एक जुने झाड पडले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, मोठी वाहतूक कोंडी झाली.
या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पडलेले झाड हटविले. पुरंदर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत धोकादायक व जीर्ण झालेली झाडे पडण्याची ही पाचवी घटना आहे.माजी सरपंच अमोल कामथे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोलते यांनी प्रतिनिधीला माहिती दिली . त्यामुळे धोकादायक झाडे काढण्याची मागणी होत आहे.