रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
दि. १२ मुलींनी स्वसंरक्षणासाठी शिक्षणा बरोबरच कराटे व क्रिडा प्रकारा मध्ये ही नैपुण्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन रांजणगाव एमआयडीसीच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून वाघाळे व रांजणगाव गणपती येथील विद्यालयात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी मुलामुलींना संरक्षणाचे धडे देण्यात आले आहे.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी सक्षम कसे होतील याची जनजागृती यांनी दिली आहे.
मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला रांजणगाव गणपती आणि कालिकामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघाळे येथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष अमृतमहोत्सवी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जात आहे.याच अनुषंगाने आज ( दि.१२ ) रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुलामुलींना संरक्षणाचे धडे देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना जर कोणताही त्रास होत असेल तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. सुरक्षा ही खूप महत्वाची आहे आणि स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी मुलींनी निर्भयपणे सामना केला पाहिजे असे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.तसेच दि.१३ ते १५ रोजी भारताचा राष्ट्रध्वज फडकण्यासाठी त्याचे नियम व अटी काय आहेत हे पोलीस हवालदार ब्रह्मा पोवार यांनी सांगितले.
यावेळी पोलीस हवालदार संतोष औटी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनिका वाघमारे, मूख्याध्यापक काशिनाथ वेताळ, वाघाळे प्रशाला मुख्याध्यापक गजानन दीक्षित सर, उप-मुख्याध्यापक सुभाष पाचकर,दीपक डोईफोडे, कादरखान पठाण, विशाखा पाचूंदकर, संजया नितनवरे, सुनंदा शेळके, सुरेखा रणदिवे, प्राची कुलकर्णी, भाग्यश्री टाक, जयश्री बगाटे, छाया गायकवाड आदी उपस्थित होते.