केंदूर ठाकरवाडी पिंपळखोरी ( ता शिरूर ) या ठिकाणी पाझर तलाव दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरून सांडवा वाहू लागला आहे, तलाव सांडव्याचे पाण्याचे पूजन करण्यात आले,
केंदूर परिसरामध्ये या तलावाचे महत्त्व अनन्य साधारण असून, या तलावामार्फत वर्षभर पाण्याचा पुरवठा केला जातो, शेतीबरोबर लोक वस्तीसाठी लागणारे पाणी या तलावामधून वर्षभराची तहान भागली जात असल्याने, तलाव भरल्यामुळे परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले, केंदूर परिसरामध्ये दरवर्षी पावसाळा थोडा कमीच असतो, त्यामध्ये सर्वत्र माळरान, कमी बागायत क्षेत्रामुळे पाण्याचा निचरा कमी, शिवाय वळवाचा धो धो पाऊस पडून सगळे पाणी ओढ्या नाल्यावाटे वाहून जाते त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तर शेतीसाठी पाणी तर सोडाच पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही, बऱ्याचदा शासनाला टँकरची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते, त्यामुळे हा तलाव भरल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना,त्या निमित्ताने या सुवर्ण क्षणाचे त्या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंदूर गावचे सरपंच अविनाश साकोरे उपसरपंच माऊली दादा थिटे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत थिटे विठ्ठल ताथवडे युवा नेते सनी दादा थिटे युवा नेते उमेश साकोरे अक्षय साकोरे गणेश थिटे व मान्यवर यांच्या हस्ते पाझर तलाव सांडव्याचे पाण्याचे पूजन करण्यात आले,