सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त पेरणे (तालुका हवेली) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज पार पडला,
पेरणे गावातील कदम मळा ते कोळपे वस्ती रोड कामासाठी 35 लाख रुपये निधी मंजूर करून या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले, त्याचप्रमाणे गावांमधील ग्रामदैवत पाचपीर बाबा मंदिर शुशोभीकरण 10 लाख निधी कामाचे उद्घाटन, त्याचप्रमाणे आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेरणे देवराई प्रकल्प येथे वृक्षारोपण करण्यात आले,
यावेळी आमदार अशोक बापू पवार, सरपंच रुपेश बापू ठोंबरे, उपसरपंच वर्षा वाळके, संदेश आव्हाळे, पंडित आप्पा दरेकर, बापू कदम, ग्रामपंचायत सदस्य मधुकर वाळके, रवींद्र वाळके, ऍड,शिवाजी वाळके, अहिल्या टूले, हवेली राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुरेखा भोरडे, हिरामण कदम, निलेश वाळके, शिरसवडीच्या सरपंच सीमा गावडे, साईनाथ वाळके, दादासाहेब वाळके, गजानन वाळके, दत्ता आबा गायकवाड, रमेश ढवळे, ग्रामसेवक थोरात, पीडब्ल्यूडी च्या रोडे मॅडम, चंद्रकांत वारघडे, दत्ता वाळके, सुखराम कदम, लाला शेठ वाळके, बाळासाहेब देंडगे, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,