*न्हावी सांडस ते वाघोली बंद पडलेली बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू:पै.संदिप भोंडवे यांच्या पाठपुराव्याला यश*
-[मा.महापौर मुरलीधर मोहोळ व पूर्व हवेलीतील शिष्ठामंडळाचे प्रयत्न यशस्वी]-
सुनील भंडारे पाटील
बऱ्याच दिवसांपासून बंद पडलेली न्हावी सांडस ते वाघोली पीएमपीएलची बससेवा भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांच्या पाठपुराव्यातून व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष प्रयत्नांतून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
मागील महिन्यात पीएमपीएल प्रशासनाने जिल्ह्यातील अनेक बस मार्गावरील बसेस तोट्याचे कारण देत बंद केले होत्या,यामध्ये वाघोली ते न्हावी सांडस या बससेवेचा सुद्धा समावेश होता.गेली वीस वर्षापासून मनपा ते न्हावी सांडस अशी बस सेवा सुरू होती मागील काही वर्षांपासून ती वाघोली ते न्हावी सांडस अशी सुरू झाली होती.या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये नऊ गावांचा समावेश व इतर परिसरातील गावांचा समावेश होत होता,व परिसरातील सात गावांमध्ये एसटी सारखी दुसरा कुठलिही सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व महिलांचे हाल होत होते.यासाठी भाजपाचे हवेलीचे तालुकाध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सर्व गावांचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आल होत.
पै.संदीप भोंडवे यांच्या पाठपुराव्यातून व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष प्रयत्नांतून योग्य प्रतिसाद देऊन पीएमपीएलचे अधिकारी यांना संपर्क साधून ही बस सुरू करण्याविषयी विनंती केली व याच मागणीचा पीएमपीएल प्रशासनाने योग्य तो अभ्यास करून बस सेवा सुरू केल्याने विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,कामगार वर्ग,शेतकरी बांधव व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व गावांच्या वतीने पीएमपीएल प्रशासन,माजी महापौर मुरलीधर मोहोळ,भाजप तालुकाध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांचे आभार मानले.
या शिष्टमंडळामध्ये बुर्केगावचे सरपंच संतोष पवळे,वीज नियंत्रण समितीचे सदस्य विपुल शितोळे,डोंगरगावचे माजी सरपंच संतोष गायकवाड,पिंपरी सांडसचे उपसरपंच दीपक लोणारी,ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शिंदे,पेरणेचे तंटामुक्ती अध्यक्ष दसरथ वाळके आदीं पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.